इंजिनियरिंग चा खेळ
इंजिनियरिंग च्या दुनियेत
सेम टू सेम असत सगळ
कॉलेज,वर्ष कोणतेही असल तरी
शुरू असत हेच सहा महिन्यांचा चक्र
पहिल्या महिन्यात वेकेशन क्लास मधून शेवटी सुटका होते,
त्यात कॉलेज च्या लेक्चर्स ची भर पडत जाते
आधीच रिज़ल्ट ची वाट पाहून रोज झोप उडाली असते
कसेबसे रिज़ल्ट लागल्यावर सेम ची खरी सुरवात होते
दुसरा महिन्यापासून असाइनमेंट्स चे आगमन होते
सगळीकडे त्याचीच देवाण घेवाण चालू असते
आधीच फेस्ट आणि डेज़ साजरे करण्यात मन धुंद असते
यातच असाइनमेंट्स चेक करण्याची लास्ट डेट पण निघून जाते
तीसर्या महिन्यात प्रॅक्टिकल्स ची वेवस्थित सुरवात होते
यूनिवर्सिटी ची एक्सपेरिमेंट लिस्ट पाहून डोके चक्रावून जाते
कितीही डॉकेफोद केली तरी आउटपुट बरोबर येत नसते
शेवटी कॉपी पेस्ट आणि गूगले च्या सहयाने फाइल कंप्लीट होऊन बसते
चवतया महिन्यात सबमिज़न शुरू होते
मी लिहिलेल्या गोष्टी गेल्या कुठे याची शोडॉशॉड चालू होते
दिवसरात्र याचे लिखाण शुरूच असते
शेवटी चंटू-बॅंटू,दादा-ताई च्या मदतीने सबमिशन होऊन जाते
या नंतर वायवा ची सुरवात होते
आणि गेल्या चार महिन्यात अभ्यास करायला हवा होता असी जाणीव होते
एक्सटर्नल चे प्रश्नाचे उत्तर कुठे सापडत नाही
आणि आपण केलेल्या उत्तरांवर तो प्रश्न विचारतच नाही
शेवटच्या महिन्यात फाइनल परीक्षेची सुरवात होते
आणि या महिन्यातच आपली सिलबसशी खरी ओळख पत्ते
टेकमक्स,नोट्स,लमर,आइम्प्स ची झुंज चालूच असते
आणि पूर्ण जोमात 40 प्लस चे धेय साध्य होते
या नंतर भेटते दोन आठवडे विश्रांतीची वेळ
ज्या नंतर परत शुरू होतो हाच सहा महिन्यांचा खेळ
No comments:
Post a Comment